Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! 28 जूनपर्यंत अटक टळली

| Updated on: Jun 24, 2023 | 9:41 AM

मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 28 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. वानखेडे यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची केस डायरी मागवली आहे. त्याचबरोबर वानखेडेविरुद्ध सीबीआयचा तपास सुरू असल्याचा युक्तिवाद देखील न्यायालयाने ग्राह्य धरलेला नाही.

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 28 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. वानखेडे यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची केस डायरी मागवली आहे. त्याचबरोबर वानखेडेविरुद्ध सीबीआयचा तपास सुरू असल्याचा युक्तिवाद देखील न्यायालयाने ग्राह्य धरलेला नाही. आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये वानखेडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केला. त्यांनी त्या माध्यमातून बेहिशोबी मालमत्ता जमा केली. तर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. त्यावरून सीबीआय चौकशी करत आहे. पण आता न्यायालयाने वानखेडे यांच्या अटकेला अंतरिम स्थगिती देताना 28 जूनपर्यंत त्यांना अटक करता येणार नाही असा आदेश दिला आहे.

Published on: Jun 24, 2023 09:41 AM
Good News : आता अमेरिकेतच H1B व्हिसा रिन्यू होणार, PM मोदी यांनी केली घोषणा
BMC Covid Scam : कूंपनच शेत खातं असा धक्कादायक प्रकार; लाईफलाईनच्या घोटाळ्यात जेजेचा डॉक्टर