Subhash Wankhede on Modi Government | मोदी सरकारपेक्षा इंग्रज बरे, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जहाल प्रतिक्रिया

| Updated on: Aug 04, 2022 | 3:53 PM

Subhash Wankhede on Modi Government | इंग्रज सरकार मोदी सरकारपेक्षा बरे असल्याची घणाघाती टीका माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली आहे.

Subhash Wankhede on Modi Government | इंग्रज सरकार (British Ruler) मोदी सरकारपेक्षा (Modi Government) बरे असल्याची घणाघाती टीका हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash Wankhede)यांनी केली आहे. वानखेडे नुकतेच स्वगृही म्हणजे शिवसेनेत परत आले आहेत. अनेक आमदार आणि खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्याने शिवसेनेत आता नव्या आणि जून्या नेतृत्वाला पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. दरम्यान एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी मोदी सरकारच्या (Modi Government) सूडाच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. या सरकारपेक्षा इंग्रज बरे होते. त्यांनी देशातील जनतेचा एवढा छळ केला नसेल त्याहून अधिक छळ भाजप सरकार, मोदी सरकार शिवसेना आणि त्याच्या आमदार आणि खासदारांचा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. धाक दाखवून आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसैनिकांना शिंदे गटात नेण्यात येत असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

Priyanka Chaturvedi on Shinde | घटनेचे नियम तोडून शिंदे सरकार अस्तित्वात, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
Amol Mitkari On BJP | तिरंग्याच्या आडून भाजपचे व्यावसायिक धोरण, अमोल मिटकरी यांनी डागली तोफ