मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फेरबदलाची शक्यता, काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होणार बदल-सूत्र
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या.
Maharashtra Assembly Session 2024: लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल, तर काहींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित आणि सुधीर मुनगंटीवार यांचं खातं बदललं जाऊ शकतं. रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांचं यामध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक, नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. महिला आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. शिवेंद्रराजे भोसले यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 16, 2024 02:11 PM