Chandrakant Patil | नड्डाच्या चंद्रपुरातील आदेशाने शिंदे गटाला हादरे, काय म्हणाले चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी, नड्डा यांच्या मिशन 144 ची माहिती देताना, शिंदे गटाच्या मतदारसंघात सुद्धा भाजप निवडणूक लढवणार असल्याचे म्हटलं आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मात्र शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची सभा चंद्रपुरात पार पडली. यावेळी नड्डा यांनी देशात होणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुका लढण्याच्या सुचना दिल्या. फक्त लोकसभा निवडणुकाच नाही तर सर्वच्या सर्व जागा लढवण्याचे त्यांनी सांगितलं आहे.
त्यांच्या या आदेशाने मात्र शिंदे गटाला हादरे बसल्याचेच पहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले होते. त्यानंतर आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखिल नड्डा यांनी असाच आदेश दिल्याचे म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी, नड्डा यांच्या मिशन 144 ची माहिती देताना, शिंदे गटाच्या मतदारसंघात सुद्धा भाजप निवडणूक लढवणार असल्याचे म्हटलं आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मात्र शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.
Published on: Jan 02, 2023 08:31 PM