Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याचे उद्घाटन केले अन् आंदोलकांनी त्याचे शुद्धीकरण, नेमकं काय घडलं ‘या’ शहरात?
मुख्यमंत्री आले काय आणि उद्घाटन करुन याचे श्रेय घेतले काय? म्हणून संतप्त आंदोलकांनी उद्घाटन केलेल्या पुतळ्याचे शुद्धीकरण केले आहे. या दरम्यान स्थानिक संघटनांना प्रवेश न देताच उद्घाटन करण्यात आले.
औरंगाबाद : येथील मराठवाडा विद्यापीठात (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा रहावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा सुरु होता. त्याच लढ्याला अखरे यश आले आहे, असे असताना मात्र, (Eknath Shinde) मुख्यमंत्री आले काय आणि उद्घाटन करुन याचे श्रेय घेतले काय? म्हणून संतप्त (Agitator) आंदोलकांनी उद्घाटन केलेल्या पुतळ्याचे शुद्धीकरण केले आहे. या दरम्यान स्थानिक संघटनांना प्रवेश न देताच उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे अशा पद्धतीने केलेले उद्घाटन हे मान्य नसल्यामुळे मुख्यमंत्री मार्गस्थ होताच आंदोलकांनी हे कृत्य केले आहे. संघटानांच्या कार्यकर्त्यांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठी लढा उभा केला आणि यांनी त्याला राजकीय स्वरुप दिल्याने हा विरोध आंदोलकांनी केला आहे.
Published on: Sep 17, 2022 08:53 PM