भ्रष्टाचारप्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट, अडचणी कायम; तक्रारदाराकडून आक्षेप
त्यामुळे ही क्लीन चिट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी आरोप केले होते.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | भाजप नेते आणि आमदार राहुल कुल यांना सरकारकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे ही क्लीन चिट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांना क्लीन चिट मिळाल्याने राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र क्लीन चिट मिळाल्याने राहुल कुल यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण त्यांना दिलेली क्लीन चिट चुकिची असल्याची टीका तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी सरकारवर आरोप केला आहे. त्याचबरोबर त्यांनी याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तक्रारदार ताकवणे हे याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.
Published on: Aug 03, 2023 12:01 PM