धक्कादायक! पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरु असताना….; थोडक्यात बचावले मजूर

| Updated on: Aug 07, 2023 | 9:41 AM

वेळ आली होती पण काळ आला नव्हता असेच येथे घडलेल्या घटनेत जखमी झालेल्या मजूरांच्या बाबतीत घडलं आहे. येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू होते.

यवतमाळ, 7 ऑगस्ट 2023 | यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील पोखरीत मोठी धक्कादायक घटना घडली आहे. वेळ आली होती पण काळ आला नव्हता असेच येथे घडलेल्या घटनेत जखमी झालेल्या मजूरांच्या बाबतीत घडलं आहे. येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू होते. ते अचानक पडल्याने पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर या घटनेमुळे ग्रामस्थ आता चांगलेच संपाले असून निकृष्ट दर्जाचे बांधकामाची चौकशी होणार का असा सवाल केला जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोखरी येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम होते. हे कामसुरू असतानाच स्लॅबचे सेंट्रींग कोसळले. ज्यामुळे पाच मजूर जखमी झाले. यानंतर निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तर या निकृष्ट बांधकामाचे चौकशीा करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. तर सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Published on: Aug 07, 2023 09:41 AM
भाजप प्रवेशाची चर्चा? आव्हाड म्हणतात ‘…शी… शी… शी… मला गंमत वाटते…’
अजित पवार गट अडचणीत येणार? शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका