Special Report : फॉर्म्युला ठरला?; भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती महामंडळं?
सत्तावाटपात आता तिसरा भागिदार आल्याने वाटपातही तिन वाटण्या झाल्या. यातून आता नवी समिकरणं आणि नवी सुत्रं पाहायला मिळत आहेत. आताही महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरिल नियुक्यांवरून अशाच वाटण्या आणि नवी सुत्रं समोर येत आहेत.
मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | एक दिड महिन्याआधी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अचानक अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला होता. तर या प्रवेशाने भाजपसह शिंदे गटातील नेत्यांची गोची झाली होती. तर सत्तावाटपात आता तिसरा भागिदार आल्याने वाटपातही तिन वाटण्या झाल्या. यातून आता नवी समिकरणं आणि नवी सुत्रं पाहायला मिळत आहेत. आताही महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरिल नियुक्यांवरून अशाच वाटण्या आणि नवी सुत्रं समोर येत आहेत. तर शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्तीचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर येत असून तो ५०-२५-२५ चा आहे. याच्याआधी भाजप आणि शिंदे गट यांच्यात ६०-४० असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) सामील झाल्यांनतर यात बदल झाला असून भाजप मोठा असल्याने त्यांच्या वाट्याला ५०, शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी २५-२५ महामंडळ देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. तर यावरच हा स्पेशल रिपोर्ट…