सामनाच्या अग्रलेखाला तरूण भारतमधून उत्तर; आपले नालायकपण मान्य करायचे नसले की….
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दौनिक सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला आता तरूण भारतमधून जशाच तस उत्तर देण्यात आलं आहे.
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडून आता आक्रमक पवित्रा घेतला जात असून आंदोलनं केलं जात आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी थेट न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे. तर या इशाऱ्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करताना मी वाट पाहतोय. हवा तर वकील मी देतो असं म्हटलं आहे. याचदरम्यान आता सामनाच्या या टीकेला तरूण भारतमध्ये जशाच तसे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यावेळी तरूण भारतमध्ये, राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या शिवसेनेला अंधारात नेलं. तरी ही बाब उद्धव ठाकरे यांना कळत नाही. तर आपले नालायकपण मान्य करायचे नसले की, दुसऱ्याच्या लायकपणावरही चिखलफेत करता येते अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे. तर राऊत, सामना आणि उबाठा शिवसेना यांचेही आता असेट काहीसं झालं आहे अशी देखील टीका करण्यात आली आहे.