मनोज जरांगे पाटील यांच्यासाठीच लाठीचार्जचा निर्णय… काय म्हणाले पोलीस अधीक्षक?

| Updated on: Nov 06, 2023 | 11:34 PM

जी चौकशी समिती नेमली आहे त्यांनी चौकशी केली आहे. माझे ही जबाब नोंदवण्यात आले आहेत. चौकशी समिती जो काय अहवाल द्यायचा आहे तो देईल. यामध्ये कोणाची चूक आहे हे शोधत बसण्यापेक्षा हा निर्णय मनोज जरांगे यांच्यासाठी घ्यावा लागला.

पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : अंतरवाली सराटी गावात झालेल्या घटनेचे आदेश कोणीही दिलेले नव्हते. हा निर्णय आम्ही आमच्या प्रशासकीय स्तरावर घेतला होता असे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांच्या तब्येतीकडे पाहून आम्ही त्यांना हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, कार्यकर्त्यांनी पोलिसांना प्रतिकार करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. आमचा हेतू चांगला होता. मात्र, हा निर्णय घ्यावा लागला. आम्ही ज्या फायबर बुलेट वापरल्या त्याने जीवितहानी होत नाही. जी चौकशी समिती नेमली आहे त्यांनी चौकशी केली आहे. माझे ही जबाब नोंदवण्यात आले आहेत. चौकशी समिती जो काय अहवाल द्यायचा आहे तो देईल. यामध्ये कोणाची चूक आहे हे शोधत बसण्यापेक्षा हा निर्णय मनोज जारंगे यांच्यासाठी घ्यावा लागला. उपोषण कर्त्याचे प्राण वाचवण्यासाठी ही कारवाई करण गरजेच होते. यामध्ये गृहमंत्री किंवा कोणीही आदेश दिले नाहीत असेही त्यांनी सांगितले.

Published on: Nov 06, 2023 11:34 PM