‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ ‘शिवडी न्हावा शेवा सी लिंक’ आता या नावानं ओळखलं जाणार; राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय
वांद्रे वर्सोवा सी लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ आणि ‘शिवडी न्हावा शेवा सी लिंकला’ ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला आहे.
मुंबई : आज झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. एका महत्वाच्या विषयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे आता बहुचर्चीत असणारे ‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ ‘शिवडी न्हावा शेवा सी लिंक’ हे नव्या नावाने ओळखले जाणार आहेत. वांद्रे वर्सोवा सी लिंकच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक पत्र लिहलं होतं. ज्यात या सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. तर ‘शिवडी न्हावा शेवा सी लिंक’ला भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची मागणी करण्यात आली होती. आजच्या झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे येथून पुढे आता ‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ हा स्वातंत्र्यवीर सावरकर सी लिंक तर ‘शिवडी न्हावा शेवा सी लिंक’ हा अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू अशा नावाने ओळखला जाईल.