25 वर्ष सेवा, अखरेचा निरोप, मुंबईकर भारावले

| Updated on: Oct 05, 2023 | 8:37 PM

मुंबईकरांच्या सेवेमध्ये जवळपास 25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणारी प्रसिद्ध अशा डबल डेकर बसने अखरेचा निरोप घेतला. डिझेलवर चालणारी ही बस असल्याने ती बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र, येणाऱ्या काळात लवकरच इथेनॉलवर चालणारी ओपन डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेसाठी आणली जाईल अशी अपेक्षा मुंबईकरांना आहे.

मुंबई : 5 ऑक्टोबर 2023 | मुंबईकरांच्या सेवेमध्ये जवळपास 25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणारी डबल डेकर बसने मुंबईकरांचा अखरेचा निरोप घेतला. डिझेलवर चालणारी ही बस मुंबईकरांच्या सेवेसाठी अनेक वर्षापासून कार्यरत होती. ओपन बसमध्ये सर्वसामान्य मुंबईकर किंवा बाहेरून आलेले प्रवासी मुंबई दर्शन घेत होते. या बसला शेवटचा निरोप देण्यासाठी मुंबईकर जमले होते. नारळ फोडून आणि केक कापून लोकांनी या बसला निरोप दिला. या बसला निरोप देताना ड्रायव्हर आणि कंडक्टर सोबतच अनेक मुंबईकर देखील भावुक झाले. बदल निश्चित असतो तरी देखील येणाऱ्या काळात इथेनॉलवर चालणारी डबल डेकर ओपन बस मुंबईकरांच्या सेवेसाठी आणली पाहिजे अशी भावना मुंबईकरांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळात सरकार किंवा बेस्टतर्फे लवकरच ओपन डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेसाठी आणली जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Oct 05, 2023 08:36 PM
नारायण राणे म्हणाले, त्याचे नाव घेतलं तर मला जेवणही जात नाही
अण्णा हजारे उचलणार टोकाचे पाऊल, आव्हाड यांना ‘ते’ विधान भोवणार