Special Report : ईडीच्या छाप्यांमुळं महाराष्ट्र हादरला; ठाकरे-राऊत यांच्या निकटवर्तींवर धाडीचं नेमकं कारण काय?

| Updated on: Jun 22, 2023 | 10:16 AM

शिवसेनेतील नेते खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयंवर पडलेल्या ईडीच्या छापेमारीने शिवसेना आक्रमक झाली आहे. तर थेट रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरेश चव्हाण आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरसह 15 ठिकाणी ईडीने काल छापेमारी केली

मुंबई : राज्यात प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. शिवसेनेतील नेते खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयंवर पडलेल्या ईडीच्या छापेमारीने शिवसेना आक्रमक झाली आहे. तर थेट रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरेश चव्हाण आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरसह 15 ठिकाणी ईडीने काल छापेमारी केली. तर कथीत कोविड सेंटर घोटाळ्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या किरीट सोम यांनी केला होता. तर सुरज चव्हाण यांचा टेंडर प्रक्रियेच्या व्यवहारात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. याचप्रकरणात आयएएस अधिकारी आणि मुंबई महानगरपालिका तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याही ईडीने छापेमारी केली. यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 22, 2023 10:16 AM
VIDEO : ‘अजित पवार यांच्या इच्छेवर दुसऱ्या पक्षांनी का रिअॅक्शन द्यावी?’, राऊत यांचा सवाल
” एकनाथ शिंदे आधीपासूनच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नव्हते”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा