निजाम काळातला गुंता आणि मराठा आरक्षण, अनेक वर्षांपासून होतेय ती एक मागणी

| Updated on: Sep 04, 2023 | 11:25 PM

भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याचे दोन भाग झाले. तर हैद्राबाद संस्थानाचा निजाम याने भारतात सामील होण्यास नकार दिला होता. हैद्राबाद संस्थानाने आताचा मराठवाडा, कर्नाटक-आंध्र आणि तेलंगणा इतका भाग व्यापला होता. त्यावेळी हैद्राबाद संस्थानामध्ये कुणबी जात होती...

मुंबई : 4 सप्टेंबर 2023 | जालन्यात आंदोलन नेमकं कोणत्या कारणासाठी आहे याची अनेक नेत्यांनाही माहिती नाही. ही मागणी नेमकी काय आहे? अनेक वर्षांपासून ती एकच मागणी होत आहे. त्यासाठी आंदोलनं होत आहेत. मात्र, नेते तो मुद्दा किती समजून घेतात हा प्रश्न महत्वाचा आहे. मनोज जरांगे पाटील याचं जे आंदोलन आहे, त्याचा थेट सुप्रीम कोर्टातल्या मराठा आरक्षणाशी संबंध येत नाही. हे आंदोलन मराठवाड्यातल्या शेतकरी मराठा कुटुंबियांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचं आहे. त्यामुळेच मराठा-कुणबी मुद्दा काय ते समजून घेणे आवश्यक आहे. 15 ऑगस्ट 1947 च्या नकाशामध्ये भारत स्वातंत्र झाला. पण, त्याचे दोन भाग झाले. यात एक भाग होता तो म्हणजे हैद्राबाद संस्थानचा, निजामाचा. तो भाग स्वतंत्र झाला नव्हता. तोच आताचा मराठवाडा, कर्नाटक-आंध्र आणि तेलंगणा ही राज्य. हैद्राबात संस्थानात मराठवाड्यातल्या मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद होती. आणि इथूनच जरांगे पाटलांच्या मुद्द्याची सुरुवात होते. पहा हा tv9 चा स्पेशल रिपोर्ट..

Published on: Sep 04, 2023 11:25 PM
बच्चू कडू यांच्याकडे कोणत्या जातीचं प्रमाणपत्र? जरांगे यांच्या भेटीदरम्यान सांगितली ‘अंदर की बात… ‘
Bachchu Kadu यांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, ‘अन्यथा अंत व्हायला वेळ लागणार नाही’