निलंगा ताडमुगळीमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल, मंदिरात नारळ फोडल्याने कुटुंबाचा बहिष्कार

| Updated on: Feb 05, 2022 | 11:48 AM

निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये तरुणाने (Temple) मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नारळ वाढवला. या क्षुल्लक कारणावरुन गावातील संपूर्ण समाजानेच या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याची घटना निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात घडली आहे.

पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाठ थोपटली जात असली तरी याच (Maharashtra) राज्यात माणुसकीला काळीमा घटनाही घडत आहेत. निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये तरुणाने (Temple) मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नारळ वाढवला. या क्षुल्लक कारणावरुन गावातील संपूर्ण समाजानेच या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याची घटना निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात घडली आहे. तब्बल तीन दिवस या कुटूंबाला गावकऱ्यांनी वाळीत टाकले होते.  बहिष्कार टाकल्यानंतर सदरील कुटूंबातील सदस्यांना साधे पीठही दळून दिले नसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ नंतर पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर हे बहिष्कार प्रकरण मिटले आहे. पण एका समाजातील तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानेच हा प्रकार घडला आहे. अद्याप याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही पण या प्रकरामुळे संताप व्यक्त होत आहे.

Published on: Feb 05, 2022 11:46 AM
विठुरायाच्या विवाह सोहळ्यासाठी 36 प्रकाराच्या फुलांची सजावट
Thane | जम्बो मेगाब्लॉकमध्ये प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट, कळवा ते ठाणे पायी प्रवास