महाबळेश्वरला निघाला असाल तर थांबा; ‘हा’ महत्वाचा धबधबा तुम्हाला पाहता येणार नाही? ऐन पावसाळ्यात पर्यटकांना बंदी
कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकण पट्ट्याला पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे या येथील नदी नाल्यांना पूर आला आहे. तर येथील धबधबे देखील आता प्रवाहित झाले आहेत. ज्यामुळे पर्यटकांचे लोंडे च्या लोंडे तिकडे जाताना दिसत आहे.
सिंधुदुर्ग 23 जुलै 2023 | पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकण पट्ट्याला पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे या येथील नदी नाल्यांना पूर आला आहे. तर येथील धबधबे देखील आता प्रवाहित झाले आहेत. ज्यामुळे पर्यटकांचे लोंडे च्या लोंडे तिकडे जाताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला त्यावरून कडक पावले उचलावी लागलत आहेत. सध्या काहिशी स्थिती अशीच महाबळेश्वरमध्ये पहायला मिळत आहे. सध्या महाबळेश्वरला ही मुसळधार पाऊस पडत आहे. बहुतांशी पर्यटक हे उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरला कुटुंबासोबत फिरायला येतात. मात्र काही पर्यटक पावसाची वेगळी मजा अनुभवण्यासाठी जुन, जुलै महिन्यात महाबळेश्वरला पसंती देतात. यावर्षी पाऊसाला जरी उशीरा सुरुवात झाली असली तरी जुलै महिन्यात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथील धबधबे डोंगर कपारीतून भरुन कोसळू लागले आहेत. सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरू पाहतोय तो म्हणजे 1278 फुटावरून कोसळणारा प्रसिध्द लिंगमळा धबधबा. मात्र मुसळधार पावसामुळे या परिसरातील ओडे नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सध्या लिंगमळा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.