ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित; पण, धरणे आंदोलन सुरूच, कुणी घेतला निर्णय?
विरोधीपक्ष नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्र्वादिचे नेते अनिल देशमुख यांचे नाव सरकारसोबत चर्चेला जाणाऱ्या शिष्टमंडळात नाही. या दोन्ही नेत्याचा समावेश शिष्टमंडळात करावा अशी मागणी ओबीसी महासंघाने केलीय. तर. सरकारने चर्चेचं निमंत्रण देऊन आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती नाकारली आहे.
नागपूर : 22 सप्टेंबर 2023 | नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे सुरु असलेलं आमरण उपोषण पुढील सात दिवस म्हणजेच २९ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आलंय. मात्र, येथे साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु राहणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांनी केली. नागपूर येथे सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा 13 वा दिवस आहे. सरकारने ओबीसी महासंघाला २९ तारखेला चर्चेसाठी बोलावले आहे. हा प्रस्ताव आल्यामुळे आमरण उपोषण २९ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. जरांगे यांची मागणी मान्य झाल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यसरकारचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर राज्यभरातील आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागे घेणार असेही त्यांनी सांगितले.
Published on: Sep 22, 2023 09:30 PM