पुण्यात रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
राज्यात पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही पुण्यात होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नगरमध्ये दिली.
अहमदनगर : काही दिवसांपुर्वीच राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या होत्या. त्यावेळी पुरुषांनी लाल माती कपाळी लावत शड्डू ठोकला होता. आता पुन्हा एकदा राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत. यावेळी मात्र त्या पुरूषांच्या नाही तर महिलांच्या होणार आहेत. ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार आहे. त्यामुळे राज्यातील महिला कुस्ती पटूंना आता या स्पर्धेचे वेध लागले आहेत. यावेळी कुस्ती महासंघाच्या सहयोगी समितीची घोषणा देखिल करण्यात आली. याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नगरमध्ये दिली.
Published on: Mar 07, 2023 03:52 PM