सरसकट दाखले देण्याचा निर्णय घेतला नाही, या माजी आमदाराने दिली महत्वाची माहिती

| Updated on: Nov 08, 2023 | 11:50 PM

जो ओबीसी हित की बात करेगा वही देश में राज करेगा. बाळासाहेब सराटे हे मराठा समाजाला घूमजाव करणारं वक्तव्य करत आहेत. जरांगे पाटील यांनी समजून घ्यावं की मराठा हे मागास नाही. गुज्जर समाजाचं आंदोलन झालं, ट्रेन बसेस जाळल्या पण आरक्षण मिळालं नाही, हे त्यांनी समजून घ्यावं.

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : ओबीसी समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना भेटलो. त्यांनी सरसकट दाखले देण्याचा निर्णय आम्ही घेतला नाही असे सांगितले अशी माहिती शेंडगे यांनी दिली. मुख्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला आहे. एससीबीसी आरक्षण मराठ्यांना कसं मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत. बॅक डोर एंट्री नाही. गावागावांत दबाव आणला जात आहे, कुणबी लिहीलं जातंय. मात्र, कलेक्टरला अशा सूचना नाहीत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे मुख्यमंत्री यांनी सांगितले असे ते म्हणाले. छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत. त्यांना एकटं पडू देणार नाही. २६ नोव्हेंबरला राज्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा घेंर आहोत. तिथे शक्ती प्रदर्शन करणार. दिवाळीनंतर आम्ही आंदोलन करणार आहोत असे त्यांनी सांगितले. सरकारमध्ये इतर ओबीसी नेते आहेत मात्र ते आवाज उठवत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.

Published on: Nov 08, 2023 11:50 PM
श्रीमंतीची शायनिंग मारू नका… जरांगे पाटील कुणावर भडकले?
मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर या कारणामुळे माजी महापौर यांनीही घेतली ती शपथ