‘आमदारकीला लाथ मारतो’, अजित पवार गटाच्या आमदाराच्या रागाचा पारा का चढला?
आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज झाला आणि वातावरण तापलं...याच मुद्द्यावरुन अजित पवारांच्या बारामतीत, सत्तेतून बाहेर पडा अशा घोषणा देण्यात आल्यात. दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार चांगलेच भडकलेत
मुंबई : 4 सप्टेंबर 2023 | अजितदादा यांच्या बारामतीमधूनच अजित पवार सत्तेतून बाहेर पडा अशा घोषणा देण्यात आल्या. जालन्यातील लाठीचार्जच्या विरोधात बारामतीत निषेध मोर्चा निघाला आणि याच मोर्चावेळी दादांनी सरकारमधून बाहेर पडावं, अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र, अशी कोणाचीही मागणी नाही. 14 कोटी लोक इथं राज्यांत रहातात त्यातील एकाची मागणी आहे, असे अजित पवार म्हणाले. लाठीचार्जचे आदेश नेमके कोणाचे? असा विरोधकांचा सवाल आहे. हे आदेश मंत्रालयातून गेले असाही विरोधकांचा आरोप आहे. त्यावर अजितदादा यांनी हे आरोप सिद्ध करा, मी राजकारणातून बाहेर पडेन. आरोप सिद्ध नाही केले तर तुम्ही राजकारण सोडून द्या असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिलंय. पण, मराठा आंदोलकांवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला. त्यावरुन अजित पवार गटातलेच आमदार राजेंद्र शिंगणे यांनीही रोष व्यक्त केलाय. अशा आमदारकीला लाथ मारतो, सत्तेत असलो तरी सरकार जमा नाही, अशी रोखठोक भूमिका शिंगणे यांनी घेतलीय. समाजासाठी आमदारकीला लाथ मारतो असे ते म्हणालेत. ज्या लाठीचार्जवरुन सरकार आणि सत्ताधारी आमनेसामने आले त्याच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचलकांकडून देण्यात आले आहेत. पण, यात अजित दादा यांची नेमकी भूमिका काय आहे? पहा स्पेशल रिपोर्ट…