सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता कुणाला विनंती?
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी चौंडी येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. उपोषणामुळे काही आंदोलकांना त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली.
अहमदनगर : 25 सप्टेंबर 2023 | धनगर समाजाचे चौंडी येथे उपोषण सुरु आहे. धनगर समाजाचे आंदोलनकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांची तब्येत खालवली आहे. तर, यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांचे उपोषण सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब दोडतले यांना उपोषणा संदर्भात फोन केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. सरकार आपल्या मागण्याबाबत सकारात्मक आहे. आपण उपोषण सोडावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब दोडतले यांना केली. तसेच, मंत्री गिरीश महाजन भेटायला येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, जर या भेटीतून मार्ग निघाला नाही तर आम्ही उपोषणावर ठाम राहू अशी माहिती दोडतले यांनी दिली.
Published on: Sep 25, 2023 11:47 PM