राज ठाकरे ‘मैदानात तर या’, बजरंग दलाची ‘या’ गोष्टीसाठी तयारी
देशात गुजरात आणि हरियाणा या राज्यांनी लव्ह जिहादचा कायदा केला आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात हा कायदा झाला नाही. तो या आधीच व्हायला हवा होता.
बुलढाणा : मस्जिदीवरील भोंगे आणि अजाण यावरून उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज ठाकरे मैदानात उतरले होते. आता त्यांच्या मित्रांचे सरकार आले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेन भाऊ यांच्या काळातही त्यांनी मैदानात यावे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण, ते मैदानात कधी उतरणार? आता कधी आंदोलन करून अजाण बंद करणार आहे ? असा टोला बजरंग दलाचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरे याना लगावला आहे. लव्ह जिहाद कायद्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची आवश्यकता भासल्यास भेट घेऊ. देशात गुजरात आणि हरियाणा या राज्यांनी लव्ह जिहादचा कायदा केला आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात हा कायदा झाला नाही. तो या आधीच व्हायला हवा होता. उशीर झाला आहे. पण आता लव्ह जिहादचा कायदा करायला हरकत नाही, असेही ते म्हणाले.
Published on: Feb 09, 2023 12:22 PM