Indian Railways News : यात्रीगण कृपया ध्यान दे ! हटिया पुणे एक्सप्रेस थांबवली? नेमक काय कारण?

| Updated on: Jun 14, 2023 | 9:36 AM

त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. एखादीजरी शंका वाटली तर रेल्वे जाग्यावरच थांबवली जात आहे.

Follow us on

अमरावती : 2 जून रोजी ओडिशाच्या बालासोरमध्ये दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली होती, ज्यामध्ये 288 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात 1208 जण जखमी झाले. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. एखादीजरी शंका वाटली तर रेल्वे जाग्यावरच थांबवली जात आहे.

ओडिशाच्या रेल्वे अपघातानंतर आता महाराष्ट्रातही काही घटना होता होता वाचल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळले आहेत. अमरावतीत देखील खबरदारी म्हणून हटिया पुणे एक्सप्रेस थांबविण्यात आली. हटिया पुणे एक्सप्रेसमध्ये तांत्रीक बिघाड झाल्याची माहिती उघड होताच ती चांदुर रेल्वे जवळ एक्सप्रेस थांबविण्यात आली. त्यानंतर बिघाड आलेला डबा बाजूला काढून पुन्हा ही ट्रेन पूर्ववत करण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे नागपूरवरून मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही वेळ थांबल्या होत्या. त्यानंतर मात्र यादेखील रेल्वे सुरळीत सुरू झाल्या. विदर्भ एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस सुरळित धावू लागल्या.