द केरला स्टोरीच्या प्रोड्युसर, डायरेक्टरच्या नखालाही धक्का लागला तर…; भाजप नेत्याचा आव्हाड यांना इशारा

| Updated on: May 10, 2023 | 1:29 PM

द केरला स्टोरी हा चित्रपट केरळची बदनामी करणारा आहे. या चित्रपटाचा निर्माता कुणीही असो त्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली गेली पाहिजे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

मुंबई : द केरला स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटावरून सध्या राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि भाजपचे नेते या चित्रपटावरून आमने सामने आले आहेत. द केरला स्टोरी हा चित्रपट केरळची बदनामी करणारा आहे. या चित्रपटाचा निर्माता कुणीही असो त्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली गेली पाहिजे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी केलं होतं. त्याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आव्हाड जर लटकवण्याची भाषा करत असतील तर आम्हालाही फटकवण्याची भाषा करता येते, असा इशारा दिला आहे. तर आमचा कायद्यावर विश्वास आहे. जर द केरला स्टोरीच्या प्रोड्युसर, डायरेक्टरच्या नखालाही धक्का लागला तर, आम्ही आव्हाडांसारख्या जिहादी विचारांच्या लोकांची महाराष्ट्रात नाक्यानाक्यावर काय अवस्था करू, त्यावर पण एक चित्रपट निघेल, हे लक्षात ठेवा, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.

Published on: May 10, 2023 01:29 PM
मरीन ड्राईव्ह परिसरात अपघात टाळण्यासाठी डिव्हाडरवरचं झाडं लावणार ! BMC ची नवी शक्कल तरी काय?
The Kerala Story : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा कुणी केला मौलाना म्हणून उल्लेख?