CM EKNATH SHINDE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबडेकर भेटीवर वंचितचे नेते म्हणाले, आम्ही शिंदेसोबत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री उशीर बैठक पार पडली. त्यावर वंचितच नेते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणाले, आम्ही शिंदेसोबत...
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( uddhav thackrey ) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( prakash ambedkra ) यांच्यात युतीची चर्चा सुरु आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल अडीच तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांमध्ये वर्षा निवासस्थानी मध्यरात्री बंद दाराआड चर्चा झाली.
‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पण समारंभात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र व्यासपीठावर आले होते. त्यांनतर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, मध्यतंरी आंबेडकर यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यामुळे चर्चा उधाण आले आहे.
वंचित गटाचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकले यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना, इंदूमिल स्मारक अहवालाच्या संदर्भांत आंबेडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या अहवालावर चर्चा झाली. ज्या पक्षासोबत भाजप आहे त्यासोबत आम्ही जाणार नाही ही आमची भूमिका आम्ही आधीच जाहीर केली आहे. भाजपसोबत शिंदे सत्तेत असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. त्यामुळे शिंदे गटासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्ट केले आहे.