Raj Thackeray : ‘निशाणी असो अथवा नसो’ विचारांचा वारसा पुढे घेऊन जायचयं..

| Updated on: Aug 23, 2022 | 8:36 PM

आपण बंड केले नाहीतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगून मनसेची स्थापना केल्याचेही ते म्हणाले. एवढेच नाहीतर त्या दरम्यानचा किस्साही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितला. शिवाय अॅडजस्टमेंटचे राजकारण न करता जनतेसमोर जाऊन आपल्या पक्षाची भूमिका सांगा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

मुंबई : शस्त्रक्रियेनंतर आज प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांसमोर आले होते निमित्त होते ते पदाधिकारी मेळाव्याचे. या दरम्यान, त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. सध्याच्या राजकीय परस्थितीवर बोलताना राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. असे असले तरी सर्वांनी या राजकारणाचा एक भाग होऊन ही घाण बाहेर टाकणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर आपल्याला निशाणी वरुन काही फरक पडत नाही, निशाणी असो अथवा नसो आपण विचारांचा वारसा घेऊन पुढे जात असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यापूर्वी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यावर टीकास्त्र सोडले. तर आपण बंड केले नाहीतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगून मनसेची स्थापना केल्याचेही ते म्हणाले. एवढेच नाहीतर त्या दरम्यानचा किस्साही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितला. शिवाय अॅडजस्टमेंटचे राजकारण न करता जनतेसमोर जाऊन आपल्या पक्षाची भूमिका सांगा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Published on: Aug 23, 2022 08:36 PM
Shivsena : शिवसेना पक्षप्रमुख विधानभवनात दाखल, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे विधानभवनात
Raj Thackeray : नाव आणि निशाणी असो की नसो मीच बाळासाहेबांचा विचार पुढं नेणार, राज ठाकरेंचं उद्धव यांना आव्हान