मुंबई सह राज्य गारठणार; हवामान खात्याचा अंदाज

| Updated on: Jan 09, 2023 | 9:21 AM

राज्यात सध्या हुडहूडी जाणवत असून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असेही विभागाने सांगितलं आहे

मुंबई : राज्याच्या अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत काल कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये कमी कापमानाची नोंद झाली. याचदरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून तापमानात घट होऊन थंडी वाढणार आसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात सध्या हुडहूडी जाणवत असून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होऊन थंडी वाढेल असेही विभागाने सांगितलं आहे.

दरम्यान राज्यातील गोंदीया जिल्ह्याचं तापमान ६.८, सातपुडा डोंगर रांगातही तापमान ८ अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे. तर पुणे, अहमदनगर, जळगाव सह राज्यात देखिल तापमान घसरणार असल्याची शक्यता विभाने वर्तवली आहे.

Published on: Jan 09, 2023 09:21 AM
चाफ्याच्या झाडांचे उद्यान होऊ शकले नाही, ‘साहेब मला माफ करा’
नवाब मलिक यांना दिलासा की पुन्हा कोठडी; आज होणार फैसला?