Bachchu Kadu : कॅबिनेट नव्हे राज्यमंत्री, प्रहारच्या बच्चू कडूंना मानावं लागणार समाधान
पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार हा कॅबिनेट मंत्र्यांचा होता. यानंतर विस्तार हा राज्यमंत्र्यांसाठी आहे. यावेळी बच्चू कडूंचा विचार होऊ शकतो, असं शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांनी म्हटलंय.
अकोला : बच्चू कडू मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांचा विस्तार लवकर होणार आहे, असं वक्तव्य शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांनी केलंय. त्यावरून बच्चू कडू यांना कॅबिनेटऐवजी फक्त राज्यमंत्रीपदच दिलं जाणार आहे का, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. येणारा मुख्यमंत्री प्रहारचा राहणार असल्याची प्रतिक्रिया नाराजीनं बच्चू कडू यांनी दिली. त्यावर संजय गायकवाड म्हणाले, राज्यमंत्र्यांचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यामुळं बच्चू कडू यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावं लागण्याची चिन्हं आहेत. पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार हा कॅबिनेट मंत्र्यांचा होता. यानंतर विस्तार हा राज्यमंत्र्यांसाठी आहे. यावेळी बच्चू कडूंचा विचार होऊ शकतो, असं शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांनी म्हटलंय.
Published on: Aug 12, 2022 11:27 PM