अखेर मुहूर्त लागला! अजित पवार यांचा दिल्ली दौरा झाला आणि एका रात्रीत मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपाचा घोळ कायम आहे. यावरून अजित पवार गटासह शिंदे गट आणि भाजपमध्ये नेत्यांची नाराजी समोर येत आहे. याच दरम्यान काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली दौरा केला होता.
मुंबई : गेल्या वर्षभारापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर या महिन्यातच झाला. मात्र मंत्री पद मिळालेली अजित पवार यांच्या गटाच्या ८ मंत्र्यांसह त्यांच्याकडे कोणती खाती जातात याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपाचा घोळ कायम आहे. यावरून अजित पवार गटासह शिंदे गट आणि भाजपमध्ये नेत्यांची नाराजी समोर येत आहे. याच दरम्यान काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली दौरा केला होता. तसेच त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच तासभर चर्चा करत ते राज्यात परतले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा घोळ मिटल्याने आजच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगतण्यात येत आहे. तर या बैठकीत मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरल्याचे समोर आले आहे. यावेळी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मंत्रिपदाचा 4-4-2 असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. या फार्म्युल्यानुसार भाजपला चार, शिंदे गटालाही चार आणि राष्ट्रवादीला दोन मंत्रिपद मिळणार आहेत. त्यामुळे राज्याच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तार एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.