Sachin Ahir | मंत्रालय म्हणायचं की सचिवालय, सचिन अहिर यांनी हाणला मुख्यमंत्र्यांना टोला

| Updated on: Aug 07, 2022 | 5:01 PM

Sachin Ahir | आता मंत्रालय म्हणायचं की सचिवालय सचिन अहिरांचा टोला

Sachin Ahir | जर सर्वच अधिकार सचिवांना आणि अधिकाऱ्यांना दिले असतील, तर मंत्रालय ( Ministry) म्हणायच की सचिवालय (Secretariat) असा खोचक सवाल सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दोघांच्या सरकारला विचारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. राज्यात पुरग्रस्त परिस्थितीत आहे. कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. पण त्याविरोधातील सक्षम यंत्रणा पातळीवर कार्यरत नाही. अनेक शासकीय अध्यादेश निघाले आहेत, पण त्याची अंमलबजावणी केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. अंमलबजावणीसाठी मंत्रीच उपलब्ध नाही. प्रशासनावर वचक नसल्याचे ते म्हणाले. ही दिल्ली वारी तरी यावेळी मंत्रीमंडळ वारी ठरेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता यामध्ये वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला.

Nana Patole | तिरंगा तर डीपीवर ठेऊच, पण देशाच्या GDP चं काय? नाना पटोले यांचा रोकडा सवाल
MNS Rakhi | मुख्यमंत्र्यांच्या फोटोनंतर आता बाजारात मनसेच्या राख्या