सत्ताधाऱ्यांची गाडी सुसाट, ब्रेक लावायला विरोधी पक्षनेताच नाही; पावसाळी अधिवेशन नेत्याविनाच होण्याची शक्यता
दोन ते अडीच वर्ष अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद साभांळताना सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे काम केलं होतं. मात्र आता अजित पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला सुरूंग लावत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता विरोधी पक्षनेताच नाही.
मुंबई : राज्याच्या सत्ताकारणात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका उत्तम पार पाडली होती. दोन ते अडीच वर्ष अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद साभांळताना सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे काम केलं होतं. मात्र आता अजित पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला सुरूंग लावत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता विरोधी पक्षनेताच नाही. त्यातच आता आगामी पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषीत झाली आहे. यावर्षी पावसाळी अधिवेशन हे 7 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. मात्र अधिवेशनाला विरोधी पक्षनेताच नसल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी कशी करणार असा सवाल आता विरोधकांच्या समोर आहे. तर हे अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता निर्माण झालीय. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला नाही तर विरोधी पक्षनेत्याशिवाय अधिवेशन होईल अशी स्थिती आहे.