Mahad मध्ये विहिरीत ढकलून सहा मुलांची आईनेच हत्या केल्याचं उघड
आरोपी महिला रुना आणि पती चिखुरी हे दोघेही महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलांचे मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
महाड : महाड तालुक्यातील ढालकाठी बोरगाव परीसरात एका आईने आपल्या पोटच्या पाच मुली आणि एका मुलाला विहिरीत ढकलून ठार मारल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप तपास यंत्रणांनी याला दुजोरा दिलेला नाही. रुना चिखुरी सहानी (30) असे या आईचे नाव आहे तर चिखुरी सहानी असे पतीचे नाव आहे. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आले आहे. आरोपी महिला रुना आणि पती चिखुरी हे दोघेही महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलांचे मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Published on: May 31, 2022 01:43 AM