अखेर ”त्या” वादावर पडदा! राऊत यांनी थेट व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले, ‘तोपर्यंत मी बोलणार नाही’
यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बँनरला शिवसेनेकडून जोडे मारले जात आहेत. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडूनही सुनावलं जात आहे. यावरूनच त्यांच्यात वाक् युद्ध रंगलं आहे.
मुंबई : शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाट व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर थुंकण्यावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच रंगला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बँनरला शिवसेनेकडून जोडे मारले जात आहेत. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडूनही सुनावलं जात आहे. यावरूनच त्यांच्यात वाक् युद्ध रंगलं आहे. अजित पवार यांनी तारतम्य बाळगा म्हटल्यावर राऊत यांनी धरणातील पाण्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यापेक्षा थुंकणे कधीही चांगले. ज्याचे जळते त्याला कळते. आम्ही भोगत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून पुन्हा अजित पवार यांनी आमच्या अंगाला भोकं पडतं नाहीत. राऊत हे मोठे नेते आहेत असं सुनावलं होतं. तर संजय राऊत मोठे नेते आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. माझं काही म्हणणं नाही. पण तुम्ही का मनावर घेता, असं अजित पवार म्हणालेत. यावादावर आता संजय राऊत यांनीच पडदा टाकला आहे. त्यांनी यावरून खुलासा केलाय. तसेच मी कडक शब्दात बोललो, त्याचा खेद व्यक्त करतो. संपूर्ण गोष्ट ऐकत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, असेही ते म्हणाले.