रेल्वेच्या हद्दीतील फलक नागरिकांसाठी धोकादायक, मुंबई मनपाचे रेल्वे प्रशासनाला पत्र

| Updated on: Aug 01, 2023 | 10:55 AM

जाहिरात फलकांचे खांब रेल्वेच्या हद्दीत असले तरी फलकाचा वरचा अवजड लोखंडी भाग हा रस्त्यावर येतो. त्यामुळे कधी हे फलक कोसळल्यास पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा फलकांवरून आता मुंबई महानगरपालिकेकडून आता पावले उचलली जात आहे.

मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | रेल्वेच्या हद्दीत उभारलेले भलेमोठे जाहिरात फलक मुंबईकरांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. जाहिरात फलकांचे खांब रेल्वेच्या हद्दीत असले तरी फलकाचा वरचा अवजड लोखंडी भाग हा रस्त्यावर येतो. त्यामुळे कधी हे फलक कोसळल्यास पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा फलकांवरून आता मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) आता पावले उचलली जात आहे. या फलकांच्या बाबत लवकर निर्णय घेण्यासाठी मनपा प्रशासनाने थेट रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले आहे. तसेच हे धोकादायक फलक तात्काळ हटवावे असं पालिकेने पत्रात म्हटले आहे. रेल्वेच्या जागेत भले मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. मात्र त्याचा काही भाग पाचारी मार्गांवर येत असल्याच चित्र अनेक स्थानकावर आहे.

Published on: Aug 01, 2023 10:55 AM
मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसागणित अपघात; खड्ड्यामुळे कंटेनर पलटी
पुण्यात झळकले नरेंद्र मोदी, शरद पवार यांचे एकत्र असणारे बॅनर