तो आला, त्यानं उचलला आणि तो पळाला; आता त्या चोर भटक्या कुत्र्याचं पालिका यंत्रणेनं केलं काय पहा…

| Updated on: Jun 15, 2023 | 12:57 PM

येथे माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचा चक्क एका भटक्या कुत्र्याने बूट पळवला. तोही 15000 रांचा त्यामुळे त्या कुत्र्याला शोधण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. यामुळे राज्यभरात याची चर्चा होत असून अनेक जनांना याचं आश्चर्य वाटतं आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अनेक राजकीय घटना उडत असतानाच छत्रपती संभाजीनगर मात्र वेगळ्याच कारणानं चर्चेत आलं आहे. येथे एका कुत्र्याच्या शोध घेण्यासाठी अख्खी महापालिकाच कामाला लागली आहे. त्यामुळे याची चर्चा आता राज्यभर होत आहे. येथे माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचा चक्क एका भटक्या कुत्र्याने बूट पळवला. तोही 15000 रांचा त्यामुळे त्या कुत्र्याला शोधण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. यामुळे राज्यभरात याची चर्चा होत असून अनेक जनांना याचं आश्चर्य वाटतं आहे. तर कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चिमुरडीला जीव गमवावा लागला होता तर कुत्र्यांनी चावा घेतल्यानं अनेक जण जखमीही झाले होते. आता माजी महापौरांनाच भटक्या कुत्र्यांचा फटका बसल्यानं महापालिकेची यंत्रणाही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धावाधाव करतीय. पण आता याच्यात नवी अपडेट आली आहे. महापौरांचा बूट पळवणारे कुत्रे अखेर सापडले आहे. महापालिकेच्या डॉग स्कॉडने पकडले या श्वानांना अखेर पकडले आहे. मात्र माजी महापौरांचा बूट काही सापडलेला नाही. तर आता पकडलेल्या कुत्र्याचं मनपा प्रशासन नसबंदी करणार असल्याचं कळत आहे. तर छत्रपती संभाजीनगरात गेल्या काही दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.

Published on: Jun 15, 2023 12:57 PM
शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा संजय राऊतांच्या भावावर आरोप; सुनील राऊत म्हणतात, “ही कीड…”
लोकसभेच्या किती जागांवर भाजप लढणार? शिवसेनेचा आमदार स्पष्टचं बोलला…