‘महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त’; राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोके दिन साजरा
आपल्या सोबत 50 आमदार नेत बंड केलं होतं. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. पुण्यातही आज गद्दार दिवसाबरोबरच खोके दिन साजरा केला जात आहे.
पुणे : एक वर्षाआधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्यामुळे गेलं होतं. आजच्याच दिवशी शिंदे यांनी ठाकरे यांची शिवसेना फोडली होती. तर आपल्या सोबत 50 आमदार नेत बंड केलं होतं. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. पुण्यातही आज गद्दार दिवसाबरोबरच खोके दिन साजरा केला जात आहे. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खोके दिन साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली हा गद्दार आणि खोके दिन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 50 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देण्यात आल्या.
Published on: Jun 20, 2023 01:08 PM