महाराष्ट्रासह तीन राज्यातील पोलीसांसमोरचं नक्षलवाद्यांचं नवं चॅलेंज; नवा वॅार झोन तयार करण्याचा कट
याच्या आधी भामरागड तालुक्यात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वदिनी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. मात्र यानंतर आता दोन महिन्याच्या अंताराने पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा नवीन अड्डा तयार होण्याची शक्यता आहे.
नागपूर, 18 जुलै 2023 | महाराष्ट्रातील गडचिरोली-गोंदिया, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात घनदाट जंगलाला नक्षलवाद्यांनी आपला अड्डा केला आहे. येथे नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाया केल्या जातात. तर आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणा सिमेवर नक्षलवाद्यांकडून कारवाया देखील वाढल्या आहेत. तर याविरोधात महाराष्ट्र पोलिसांकडून देखील जशाचतस उत्तर दिलं जात आहे. याच्या आधी भामरागड तालुक्यात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वदिनी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. मात्र यानंतर आता दोन महिन्याच्या अंताराने पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा नवीन अड्डा तयार होण्याची शक्यता आहे. नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र, छत्तीसड आणि मध्य प्रदेश, या तीन राज्यातील जंगली भागात नविन वॅार झोनची तयारी केली आहे. तर महाराष्ट्राच्या सीमेवर रांजदानगाव, कवर्धा, बालाघाट परिसरात नक्षलवादी ॲक्टीव आहेत. तर केंद्रीय सुरक्षा दलांच्या कारवाईच्या भितीनं दंडकारण्याशिवाय नक्षलवाद्यांना नवा वॅार झोन तयार केलाय. याबाबत शहीद सप्ताहाच्या प्रसिद्धीपत्रकात नव्या वॅारझोनची कबुली नक्षलवाद्यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस दलातील डीआयजी संदीप पाटील यांनी दिली आहे.