विधानसभा आमदारांची संख्या आणखी वाढणार, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा मुलगा सौमित्र भातखळकर यांनी बांधलेल्या खासगी इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं विधान केलंय.
मुंबई | 21 ऑक्टोंबर 2023 : मी यापूर्वी खासगी रुग्णालयाच्या कार्यक्रमाला गेलो आहे. पण, खासगी इमारतीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला आलो आहे. हे माझं पहिलं अशासकीय भूमिपूजन आहे. असे ते म्हणाले. तुमच्यावर डबल जबाबदारी आहे. वेळेत काम झालं पाहिजे. उत्तम काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आमदार भातखळकर हे अभ्यासू आहेत. काम करणारे नेते आहेत. पण, मुलगा सौमित्र भातखळकर हा ‘बाप से बेटा सवाई निकलेगा. कारण, विधानसभेचे रिडेव्हलपमेंट मॉडेल सौमित्र भातखळकर यांनी केलं आहे. देशातल्या सर्व राज्यातील विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. 2026 मध्ये विधानसभा जागा वाढणार आहेत. सध्याची वास्तू नवीन आलेल्या आमदारांना सामावू शकणार नाही. आता अंदाजे 300 विधानसभेत आहेत. त्यापुढे जाऊन 360 होऊ शकतात. आता अशा प्रकारची बिल्डिंग तयार करायचा विचार आला तर तुम्ही जी बिल्डिंग तयार केली आहे तेच चित्र आमच्या डोळ्यासमोर येईल. त्याच्यापेक्षा कुठलंही डिझाईन आम्ही मान्य करू शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.