अजित पवार यांचे थेट आव्हाड यांनाच आव्हान? ठाण्यात आव्हाड यांच्या घरासमोरूनच फिरणार राष्ट्रवादीच्या चाव्या

| Updated on: Jul 27, 2023 | 12:29 PM

मुंबईत पक्षाचे कार्यालय सुरू केल्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे मतदार संघाकडे वळवले आहे. येथे राष्ट्रवादीचे नवे कार्यालय सुरू केले जात आहे.

ठाणे, 27 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर अजित पवार गट वाढत चालला आहे. अजित पवार गटात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतून अनेक आमदार आणि नेते जाताना दिसत आहेत. त्यानंतर अजित पवार यांनी आता आपल्या गटाच्या पक्षाचे कार्यालये सुरू करण्याची सुरूवात केली आहे. मुंबईत पक्षाचे कार्यालय सुरू केल्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे मतदार संघाकडे वळवले आहे. येथे राष्ट्रवादीचे नवे कार्यालय सुरू केले जात आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पक्षाचे नवे कार्यालयासाठी जागा पाहिली असून ती आव्हाड यांच्या घरासमोरच आहे. तर फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर या कार्यालयाचे आज उद्घाटन होणार आहे. तर हे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आव्हाड यांना शह देण्यासाठीच हे कार्यालय त्यांच्या घरासमोरच सुरू करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

Published on: Jul 27, 2023 12:29 PM
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर नारायण राणे यांची टोलेबाजी; म्हणाले, “टिनपाटाच्या डब्याचा चिरका ताशा…”
राजू शेट्टी यांचं तब्बल ७२ तास सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन संपलं, आंदोलन मागे घेण्याचं कारण काय?