Tv9 Special Report | सरकारमध्ये असणाऱ्या कडू यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ; विरोधकांची टीका?
यावेळी ना भाजप आणि ना शिंदे गटाच्या आमदारांना यात स्थान मिळाले. त्यामुळे युतीत सहभागी असणारे मित्र पक्ष देखील नाराज झाल्याचे उघड झाले होते. यावेळी मंत्रि मंडळात विरोधात बसणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला.
मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र यावेळी ना भाजप आणि ना शिंदे गटाच्या आमदारांना यात स्थान मिळाले. त्यामुळे युतीत सहभागी असणारे मित्र पक्ष देखील नाराज झाल्याचे उघड झाले होते. यावेळी मंत्रि मंडळात विरोधात बसणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला. त्यामुळे अनेकांची गोचीही झाली. त्यामुळेच मित्र पक्षातील नेत्यांचे मंत्रिपद हुकल्याचे बोलले जात आहे. त्यावरून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी स्पष्ट केली होती. आता सरकारमध्ये असणाऱ्या कडू यांनी थेट सरकारविरोधातच मोर्चा काढल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर जनएल्गार मोर्चावरून आता त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. तर सरकारमधल्याच एका आमदारावर अशी आंदोलन करण्याची वेळ आल्यानं विरोधकांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे. तर कडू हे अस्वस्थ असल्याची टीका विरोधकांनी केलीय. मोर्चाच्या माध्यमातून बच्चू कडू विरोधकांवर दबाव टाकत आहेत असा दावा अंबादास दानवेंनी केलाय. तर त्यांच्या या दाव्यावर नितेश राणे यांनी प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार असल्याचं म्हटलंय. पण कडू यांच्या या मोर्चामुळे सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट…