Ambadas Danve | विरोधी पक्षनेते अंबादास दानवे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानीची केली पाहणी
Ambadas Danve | विरोधी पक्षनेते अंबादास दानवे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि त्यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
Ambadas Danve | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) थेट शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर गेले आणि त्यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ते नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. सिन्नर तालुक्यातील काही गावात शेतावर जाऊन त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला. राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी शेतावर जाऊन पाहणी केल्यानंतर तात्काळ थेट पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यंदा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीही वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही महाराष्ट्रात दौरा करुन शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती.