संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक, विधानसभेच्या पायऱ्यावर निषेधाच्या घोषणा

| Updated on: Aug 02, 2023 | 1:02 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह देशातील थोर समाजसेवाकांवर टीका कोली होती. यात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्यासह साईबाबा यांच्यावर देखील आक्षेपाहार्य वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

मुंबई, 2 ऑगस्ट 2023 | शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी व्याख्यानात गरळ ओकली होती. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह देशातील थोर समाजसेवाकांवर टीका कोली होती. यात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्यासह साईबाबा यांच्यावर देखील आक्षेपाहार्य वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गेली दोन दिवस राज्यातील अनेक भागात आंदोलने केली जात आहे. तसेच भिडे यांच्या अटकेची मागणी होत आहे. याचवरून आज पावसाळी अधिवेशनाच्या ११ व्या दिवशी विधामंडळाच्या बाहेर यावरून जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. यावेळी विरोधकांनी संभाजी भिडे हाय, हाय या घोषणांनी परिसर दणाणूक सोडला. त्याचबरोबर हातात बॅनर घेऊन संभाजी भिडे यांनी संरक्षण देणाऱ्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध देखील करण्यात आला.

Published on: Aug 02, 2023 01:02 PM
मुद्द्याचं बोला…! विधानभवन परिसरात रोहित पवार यांच्या टी-शर्टची जोरदार चर्चा
फक्त मुद्द्याचं बोलूया…! रोहित पवार यांच्या हटके टी-शर्ट मागचं कारण काय? पाहा व्हिडीओ…