बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाहीत, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

| Updated on: Nov 20, 2024 | 4:17 PM

बारामती विधानसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात पवार घरातीलच त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवित आहेत. युगेंद्र पवार यांनी जनतेचा आशीर्वाद आम्हालाच मिळणार असे म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून राज्यभर मतदार सुरु आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर राडे झालेले आहेत. बारामती मतदार केंद्रातही अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे. यावर अजितदादांनी आमचे कार्यकर्ते असे करु शकत नसल्याचा दावा करीत सर्व आरोप फेटाळले आहेत. बारामतीत अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार उभे राहीले आहेत. त्यामुळे या लढतीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. युगेंद्र पवार यांनी बारामतीचे लोक शरद पवार यांनी कधीही विसरू शकत नाहीत. त्यामुळे जनतेचा आशीवार्द आम्हाला मिळणार असल्याचे म्हटले आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना दमदाटी तसेच बोगस मतदानाच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

 

Published on: Nov 20, 2024 04:14 PM
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड, तीन केंद्रांवर मतदान थांबवलं
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके ?