असा झाला गॅंगस्टर शरद मोहोळ याचा गेम, पोलीसांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

| Updated on: Jan 06, 2024 | 7:11 PM

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात काल भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोहोळवर अंत्यत जवळून गोळीबार झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली आहे. यातील तिघा आरोपींनी मोहोळवर जवळून गोळीबार केला. आरोपी मून्ना पोळेकर यानेच तीन पिस्तुले त्यासाठी विकत आणली होती अशी माहीती पोलिसांनी दिली आहे.

पुणे | 6 जानेवारी 2023 : पुण्यात भरदिवसा गॅंगस्टर शरद मोहोळ ( वय 40 रा.सुतारदरा, कोथरुड ) याच्यावर त्याच्या जवळच्या साथीदाराने बेछूट गोळीबार करीत त्याची हत्या केली. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने आठ आरोपींना अटक केली आहे. शरद मोहोळ याच्या घरापासून 200 ते 300 मीटरवर राहणाऱ्या मुन्ना ऊर्फ साहील पोळेकर यानेच मोहोळ याची हत्येचा मुख्य भूमिका बजावल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले. शरद मोहोळ घरी जात असताना त्याच्यावर मुन्ना पोळेकर याने त्याच्या दोन साथीदाराच्या मदतीने गोळीबार केला. दूचाकीवरून आरोपी पळून गेले होते. पोळेकर याच्याकडील फोर व्हीलरचा खेड शिवापूर टोलनाक्यावरुन गेल्याचे समजले. सातारा रोज शिरवळ येथून आठ आरोपींना अटक झाली. तीन आरोपींनी गोळी झाडल्याचे प्रथम दर्शनी वाटते. मुख्य अटक आरोपी मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे आणि आणखी एक नातवाईक विठ्ठल किसन गांदले यांचे गॅंगस्टर शरद मोहोळ बरोबर पूर्ववैमनस्य होते. शरद मोहोळ याच्या ऑफीसजवळ आरोपी मुन्ना याचे ऑफीस होते. परंतू 25 दिवसांपासून त्यांच्यात जास्त संपर्क आला होता. कानगुडेवर देखील दोन गु्न्हे दाखल आहेत तर पोळेकर वर एक गुन्हा दाखल आहे. कानगुडे आधी सुतारदरात रहायला होता. नंतर तो भूगावला राहायला गेला. आता या आरोपींची कोठडी घेतल्यानंतर नेमके कारण समजू शकल असे पोलिसांनी सांगितले.

Published on: Jan 06, 2024 07:06 PM
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण, उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती
मैदान पाहायला गरीब लेकरं 200 मोटरगाड्या घेऊन मुंबईला गेले, हे सर्व गरीब ? छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्ला