Special Report | बाबरीच्या घुमटावर चढलेले नेमके कोण होते?
बीकेसीतील मैदानावरील आपल्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लालकृष्ण अडवाणी यांचा संदर्भ देत फडणवीस यांचा समाचार घेतला होता. पण लालकृष्ण आडवाणी नेमके काय म्हणाले होते? तर घुमट पाडला कोण? त्यावर कोर्टाने काय म्हटले आहे? त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर राज्यात जोरदार टीका आणि आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील मैदानावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमने सामने आले असता बाबरी नेमकी पाडली कोणी आणि त्यावेळी नेमके होते कोण? असा प्रश्न पडला आहे. मात्र बाबरी पाडल्यानंतर ती केस सर्वोच्च न्यायालयात गेली आणि त्यावर निकाल ही आला. तर आता तेथे राममंदिराचे काम ही सुरू आहे. मात्र याच बाबरीवरून पुन्हा एकदा राज्यात श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. बीकेसीतील मैदानावरील आपल्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लालकृष्ण अडवाणी यांचा संदर्भ देत फडणवीस यांचा समाचार घेतला होता. पण लालकृष्ण आडवाणी नेमके काय म्हणाले होते? तर घुमट पाडला कोण? त्यावर कोर्टाने काय म्हटले आहे? त्यावर हा स्पेशल रिपोर्ट.