ज्या सत्तेची भीती वाटते ती उलथवायलाच हवी, उद्धव ठाकरे कडाडले

| Updated on: Dec 29, 2023 | 9:16 PM

शिवसेना शिंदे गटातील आणि भाजपातील जळगाव आणि पाचोऱ्यातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ता प्रत्येकाला आपली वाटली पाहीजे. ज्या सत्तेची भीती वाटते अशी सत्ता उलथवायलाच हवी असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही. ज्या सत्तेची भीती वाटते त्या सत्तेला बदलण्याशिवाय पर्याय नाही. त्या एका जिद्दीने मी उभा आहे. सत्ता प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहीजे. प्रत्येकाला आपले कोणीतरी ऐकणार आहे असे वाटले पाहीजे, सत्तेची भीती वाटायला नको. ज्या सत्तेची भीती वाटते त्या सत्तेला उलथवायलाच हवी, आणि ती सत्ता उलथवण्यासाठी आपण काम करतोय असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. येणारी नवीन वर्षे सर्वांना भरभराटीची आनंदाची आणि लोकशाहीची जावोत अशी शुभेच्छा त्यांनी यावेळी सर्वांना दिल्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटात शिंदे गट आणि भाजपाचा जळगाव आणि पाचोऱ्यातील कार्यकर्त्यांनी मातोश्री निवासस्थानी प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.

Published on: Dec 29, 2023 03:10 PM
राम मंदिर उद्घाटन हा भाजपाचा पक्षीय कार्यक्रम, संजय राऊत यांची टीका
अयोध्येला कोणी दिला होता शाप ? आता शापमुक्तीकडे वाटचाल ?