भाविकांच्या विरोधानंतर तुळजाभवानी मंदिर समिती घेतलेला निर्णय बदलावा लागला; तब्बल 10 पट झालेली वाढ झाली रद्द
50 रूपयांत होणारी अभिषेक पूजेसाठी भाविकांना 500 रूपये मोजावे लागणार होते. यामुळे भाविकांत नाराजी परली होती. तर विरोधही होत होता.
तुळजापूर : महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या देवी तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेत तब्बल 10 पट वाढ करण्यात आली होती. त्यामुळे 50 रूपयांत होणारी अभिषेक पूजेसाठी भाविकांना 500 रूपये मोजावे लागणार होते. यामुळे भाविकांत नाराजी परली होती. तर विरोधही होत होता. त्यानंतर आता वाढ करण्यात आलेली दरवाढ मंदिर प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिआयपी दर्शन देखील सुरू करण्यात आलं आहे. तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी वाढीव दरवाढ ही लागू करण्याबाबत निर्णय झाला होता. तर तो सोमवार पासून लागू केला जाणार होता. मात्र या निर्णयाला भाविकांनी त्याच बरोबर पुजाऱ्यांनी विरोध केल्याने अखेर मंदिर प्रशासनाला हा निर्णय रद्द करावा लागला. तर मोफत व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे.
Published on: Jul 09, 2023 12:53 PM