भाज्यांचे गणित कोलमडले, रान भाज्यांना मागणी वाढली; टोमॅटोच्या दरातही वाढ

| Updated on: Jul 31, 2023 | 11:11 AM

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस झाला आहे. तर मुसळधार पावसाचा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रात भाज्यांची आवकीवर झाला आहे. येथून होणारी पालेभाज्यांची आवक मंदावली आहे.

रत्नागिरी, 31 जुलै 2023 | कोकण पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हा मोठ्या प्रमाणात शेतीला बसला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस झाला आहे. तर मुसळधार पावसाचा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रात भाज्यांची आवकीवर झाला आहे. येथून होणारी पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. तर बाजारात टोमॅटो, मटार, फरसबी, घेवडा, मिरची यांची आवक कमी झाली आहे. तर त्याचा थेट परिणाम हा कोकणात होत आहे. कोकणात पालेभाज्यांची आवक मंदावल्याने गृहिणीचे गणित कोलमडलं आहे. येथे बहुतांश भाज्या ८० ते १०० रुपये किलो झाल्या आहेत. तर टोमॅटोचा दर तब्बल 140 किलो, मटार 150 रुपये किलो, फरसबी 100 रुपये किलो, लसूण 180 रुपये किलोच्या घरात गेले आहेत. त्यामुळे सध्या कोकणात पावसाळ्यातील रान भाज्यांना मागणी वाढली आहे.

Published on: Jul 31, 2023 11:11 AM
वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजी भिडे यांनी घेतलं संत गजानन महाराजांचं दर्शन!
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना; स्थानिक आमदार मनिषा चौधरी बोरिवली रेल्वे स्थानकात दाखल!