Mumbai Rain : पाऊस आला रे…; अखेर मुंबईसह उपनगरात पावसाला सुरूवात

| Updated on: Jun 24, 2023 | 11:57 AM

उकाड्याने हैरान मुंबईकरांसह बळीराजाचं लक्ष हे आढाळाकडे लागलं होतं. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर गेला होता. त्यामुळे राज्यात चिंतेचं वारं वाहतं होतं. आता सगळ्यांचीच चिंता मिटली असून पावसाने महाराष्ट्रात एन्ट्री मारली आहे.

मुंबई : जून महिना संपत आला तरी पाऊस झाला नव्हता. त्यामुळे उकाड्याने हैरान मुंबईकरांसह बळीराजाचं लक्ष हे आढाळाकडे लागलं होतं. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर गेला होता. त्यामुळे राज्यात चिंतेचं वारं वाहतं होतं. आता सगळ्यांचीच चिंता मिटली असून पावसाने महाराष्ट्रात एन्ट्री मारली आहे. तर मुंबईत मान्सून सक्रीय झाला आहे. आज पहाटेपासूनच दक्षिण मुंबईतील उपनगरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, मानखुर्द परिसरात पाऊस पडला. तर दादर परिसरामध्येही सकाळपासून पाऊस बरसतोय. पहाटेपासून पावसाची रिमझीम सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.

Published on: Jun 24, 2023 11:57 AM
अकलूजमध्ये रिंगण सोहळ्याआधीच राजकीय चर्चांना उधान; येथे लागला काँग्रेस नेत्याचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर
पुण्यातून बाहेर पडताय तर थांबा! आधी पहा कुठं आहे वाहतूक कोंडी?