अखेर राणा दाम्पत्याला जामीन मिळाला ; मुंबईसत्र न्यायालयाचा राणा दांपत्याला दिलासा ;

| Updated on: May 04, 2022 | 4:18 PM

तब्बल 12  दिवसांनंतर मुंबईसत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा देत कोठडीतून सुटका केली आहे. न्यायालयाने आरोपीना जामीन दिला आहे.  मात्र अत्यंत कडक अटी व निर्बंध त्यांच्यावर घातले आहेत, 

मुंबई- खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)व आमदार रवी राणा(MLA Ravi Rana)  यांना जामीन मंजूर झाला. राणा दाम्पत्याला अटी शर्तींसह जामीन मंजूर झाला आहे. दोघांना प्रत्येकी 50  हजारांच्या जात मुचलक्यावर  न्यायालयाने (Court)जामीन मंजूर केला आहे. मात्र राणा दाम्पत्याला पत्रकारांच्या समोर बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तब्बल 12  दिवसांनंतर मुंबईसत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा देत कोठडीतून सुटका केली आहे. न्यायालयाने आरोपीना जामीन दिला आहे.  मात्र अत्यंत कडक अटी व निर्बंध त्यांच्यावर घातले आहेत,  राणा दांम्पत्याला माध्यमाच्या समोर तसेच सोशल मीडियावर लिहिण्यास बोलण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच साक्षी दारांच्यावर कोणत्याही दबाब टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. याबरोबच पोलिसांना तपासात सहकार्य करायचे आहे.

 

Loudspeaker Row: मनसेच्या आंदोलनावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
महाविकास आघडी सरकारने ओबीसी समाजाचा घात केला – चंद्रशेखर बावनकुळे